ग्रामपंचायत चिन्ह

ग्राम पंचायत सलगरे LDG CODE- 188702

महाराष्ट्र शासन, भारत

आमच्या गावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे

पारदर्शकता आणि कार्यक्षमतेने समाजाची सेवा करत आहोत.

सर्व सेवा पहा

आमच्या गावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे

पारदर्शकता आणि कार्यक्षमतेने समाजाची सेवा करत आहोत.

सर्व सेवा पहा

आमच्या गावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे

पारदर्शकता आणि कार्यक्षमतेने समाजाची सेवा करत आहोत.

सर्व सेवा पहा

महत्त्वाच्या सूचना:

* स्वच्छता अभियान लवकरच सुरु होईल.. *

आदरणीय मान्यवर

आपल्या ग्रामपंचायत बद्दल

सलगरे गावचा इतिहास सलगरे गावचा इतिहास फारच रोचक आहे.गाव एकूण तीन ठिकाणी वसलेले मौखिक पुरावे जुन्या लोकांकडून समजतात.प्रथम कासारवाडी सध्याच्या गुरव समाजाच्या रानामध्ये नंतर व्हलगर नावाने सध्याच्या गुंडेवाडी यांच्या पंपाच्या पश्चिमेला असावे.कारण पूर्वी साथीचे रोग येत होते.त्यामुळे गावे स्थलांतरीत होत होती.वरील दोन्ही ठिकाणी गाव वसल्याच्या खुणा आहेत.जमिन पांढरीच्या मातीची आढळते.आता वसलेले गाव हे साधारण ११ व्या शतकात अपभ्रंश होऊन सलगरे झाले.गावची मूळ वसाहत हि बंडगर यांची आहे.साधारण ११२८ च्या जवळपास पाटील सलगरेला आल्याच्या नोंदी हेळवी यांचेकडे सापडतात.त्यानंतर पुढे १६२८ च्या सालामध्ये पाटीलकी मिळालेचे सांगितले जाते.त्यानंतरच्या काळात बाबाजी बंडगर,मालोजी बंडगर,दादाजी बंडगर,हणमंत बंडगर,पूर्वीचे विठ्ठल पाटील,श्रीपती पाटील,रावजी पाटील,आप्पासो खरात,बाळबा खरात अशा जुन्या जानकार,ज्ञानी लोकांचा वारसा सलगरेला लाभलेला आहे.बंडगर घराण्यातील सर्वच घरी पूर्वीपार पांडुरंगाची वारी आहे.त्या घराण्याला पंढरपूरमध्ये वासकर फडावर मानाचे स्थान आहे.फार पूर्वीपासून गावामध्ये बंडगर बंडगर समाज व पाटील समाज यांचे समाधी स्थान आहे.गावामध्ये पूर्वीपासून श्री.विठ्ठल रुक्मिणी, श्री.हनुमान, श्री.अंबाबाई, श्री.मायाक्का देवी, श्री.ज्योतिर्लिंग, श्री.दत्त, श्री.सिद्धेश्वर,श्री.यल्लम्मा या देवांची मंदिरे आहेत.त्यात श्री.सिद्धेश्वर मंदिर हे एकदम पुरातन आहे.गावामध्ये पूर्वीपासूनच सर्व धर्माचे बाराबलुतेदारांचे वास्तव्य आहे.गावातील सर्व धर्माचे लोक पूर्वीपासूनच एका विचाराने व गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. गावाचे वैशिष्टे म्हणजे पूर्वीपासून सांगलीप्रमाणे येथे मिरचीचे वायदे होत असत.गावाला आठवडा बाजार हा फार जुना आहे.गाव मिरची,हळद,पिकामुळे पूर्वी पासून प्रसिद्धीस आलेले आहे.दळणवळणसाठी जुने रेल्वे स्थानक आहे.बाजारपेठ मोठी व जुनी असलेने आडत्यांची दुकाने जोमात होती.गावाची ठेवण हि त्या त्या धर्मानुरूप गल्ल्यांची वसाहत दिसते.प्रत्येक समाज हा एकवटलेला दिसतो.गावात एक मुख्य पेठ आहे.त्याला लगत इतर पेठा आहेत.प्रत्येक गल्लीसाठी स्वतंत्र रस्त्याची सुविधा पूर्वीपासूनच आहे.इथे पुर्वीपार श्री.सिद्धेश्वर व विठ्ठल रुक्मिणीचा वार्षिक सप्ताह साजरा केला जातो.सर्व वार्षिक सन जुने आहेत.गावची व्याप्ती फार मोठी आहे.गावामध्ये अर्थकारणाचा मुख्य स्त्रोत हा शेती व व्यापार हा आहे.शेतीमध्ये ऊस,द्राक्षे,केळी,भाजीपाला हि मुख्य पिके आहेत.त्यानंतर दुग्ध व्यवसाय फार मोठा आहे.तसेच जर्सी गायी – म्हैशींचे मोठे गोठे आहेत.सलगरे गाव हे खिलार पैदासीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.गावचे एकूण क्षेत्र हे २२२६.२६ हेक्टर इतके आहे.गावाची आजची लोकसंख्या ८६६४ (२०११ – ५६६०) इतकी आहे.ग्रामपंचायत १९५६ साली स्थापन झाली.गावामध्ये लाईट,पक्के रस्ते,पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे.सलगरे गावचे सुपुत्र स्व.विठ्ठल (दाजी) पाटील यांची प्रथम आमदार होते व त्यांची म्हैशाळ योजनेचे जनक म्हणून ओळख आहे.असा एकूण थोडक्यात सलगरे गावचा इतिहास व विकास आहे. मिरज येथून ३२किलोमीतर अंतरावर वसलेले गाव सलगरे हे आहे .सदरचे गाव हे मिरजेच्या पूर्व भागात असून कर्नाटक सीमेवरील गाव आहे.अथणी .कवठेमहंकाळ,मिरज या तालुक्या च्या मध्यभागी आहे. मौजे सलगरे गाव हे वारकरी साप्रदायाचा वारसा असलेले गाव आहे.सलगरे गावचे ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिर हे असून त्यांची जयंती तसेच,हनुमान जयंती ,दत्त जयंती ,नवरात्र उत्सव व गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात .सलगरे गावाचे क्षेत्र हे गायरान ,डोंगराळ काही भाग बागायत मध्ये मोडत आहे . या गावातील ७५ % टक्के नागरिक सुशिक्षित असून बर्यापैकी लोक नोकरीस आहेत .या भूमीतील पुत्र मोठ्या पदावर अधिकारी आहेत काहींनी पी .एच . डी धारण केलेली आहे सलगरे गावातील सर्व धर्मातील लोक एकमेकांच्या विविध कार्यक्रमात तसेच सुख दुखात सहभागी असतात व गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मिरज पंढरपूर ब्रॉडगेज वरील गाव आहे.सलगरे गाव सन २००७/०८ मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला आहे .सन २००८/०९ साली गाव तंटामुक्त होऊन मिळालेल्या रु ७लाख बक्षिसा मधून ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केली आहे.सन २००९/१० मध्ये १२वा वित्त आयोगातून पाण्यासाठी टँकर खरेदी केला आहे .

आपले प्रतिनिधी आणि अधिकारी

सरपंच यांचे छायाचित्र

Jayashree Tanaji Patil

सरपंच

उपसरपंच यांचे छायाचित्र

Ramesh Tukaram Chalake

उपसरपंच

ग्रामपंचायत अधिकारी यांचे छायाचित्र

S Y Bhate

ग्रामपंचायत अधिकारी

लोकसेवा हक्क अधिनियम

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार विहित सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना इच्छित सेवेसाठी अर्ज करणे, शुल्क भरणा, अर्जाचा मागोवा घेणे आदी बाबी घरबसल्या करता येणार आहेत. सेवा प्राप्त करतानाच्या एकंदर प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास हेल्पलाईनद्वारे सहाय्यही उपलब्ध आहे. सेवा हमी अधिनियमांतर्गत 224 सेवांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात त्यापैकी आवश्‍यक 46 सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभाग, महसूल, पाणीपुरवठा, वन विभाग, मुद्रांक आणि नोंदणी आणि कामगार विभागांच्या सेवांचा समावेश आहे. येत्या काळात मार्च महिन्यापर्यंत उर्वरितही सेवाही ऑनलाइन करून दिल्या जाणार आहेत.

अधिक वाचा

नागरी सेवा व योजना माहिती

ऑनलाईन कर भरणा व हवामान माहिती सेवा - शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा

विकास कामे, ताज्या बातम्या आणि घडामोडी

माझी वसुंधरा अभियान ६.0

अधिक वाचा

विकास कामे / फोटो गॅलरी

अधिक वाचा

पंचायत विकास सूचकांक (PAI)

शासकीय योजना

संपर्क साधा

ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामपंचायत सलगरे ता . मिरज जि सांगली पिन कोड ४१६४१०

फोन: 9673313136

ईमेल: salgaregp49@gmail.com

हेल्पलाइन

नागरिकांसाठी सेवा

युवा नोकरी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र