[ 3 ] जल समृध्द, स्वच्छ व हरित गाव (Climate Action)
उपक्रम - 3.1 पाण्याचा ताळेबंद - लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद (वॉटर बजेट) तयार करुन पाणी व्यवस्थापन आराखडा तयार करणे
उपक्रम - 3.2 शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा -गावातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे शाश्वत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे FHTC (Functional Housing Tap Connection)
उपक्रम - 3.3 विद्युत देयके -ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजना व रस्त्यावरील दिवाबत्ती वीज देयकांचा नियमित भरणा करणे व थकबाकी शून्य असणे
उपक्रम - 3.4 पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण- गाव क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करण्यासाठी तलाव, नदी, नाले पुनर्जिवित करणे संवर्धन करणे व पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जल स्त्रोत संवर्धनासाठी वनराई बंधारे तयार करणे, सिमेंट बंधारे व केटी वेअ
उपक्रम - 3.5 रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट - गावातील सर्व शासकीय व निमशासकीय संस्था यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट स्थापित करणे.
उपक्रम - 3.6 सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे- ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातील शासकीय/निमशासकीय क्षेत्रात झाडे, बगिचा, फळबाग या करिता सुक्ष्म सिंचनाचा वापर
उपक्रम - 3.7 अपांरपरिक ऊर्जा व सौर ऊर्जा वापर
उपक्रम - 3.8 वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे
उपक्रम - 3.10 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवणे -संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत दिनांक निहाय उपक्रम आयोजित करून त्याबाबत अंमलबजावणी करून सक्रिय सहभाग घेणे.
उपक्रम - प्लास्टिक बंदी- प्लास्टिक बंदी बाबत गावात प्रभावी अंमलबजावणी केलेली असावी. एकल प्लॅस्टिक वापर पूर्णतः बंद करणे. दंडात्मक कारवाई केलेली असावी
उपक्रम - 3.11 घनकचरा व्यवस्थापन - घनकचरा व्यवस्थापन शास्त्रशुद्ध रितीने असणे (सुका कचरा व ओला कचरा विलगीकरण करून संकलन करणे, ओल्या कचऱ्यापासून खत बनविणे, सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे.)
उपक्रम - 3.12 सांडपाणी व्यवस्थापन - सांडपाणी व्यवस्थापन शास्त्रशुद्ध रितीने असणे (शोषखड्डा, एस.टी.पी व इतर उपाय योजना करणे)